शंकरनगर सहकारी गृहनिर्माण संस्था, द्वारका
प्रभू रामचंद्रांच्या पावन पदस्पशाने पावन झालेले श्री तिर्थक्षेत्र नाशिक. महाराष्ट्रातील एकमेव कुंभमेळा भरणारे पवित्र तिर्थस्थान. मंत्रभूमी, यंत्रभूमी तसेच तपोभुमी म्हणुन देखील प्रसिद्ध आहे. या नगरीमध्ये पुणे व मुंबई कडून येतांना लागणारा महत्वाचा चौक म्हणजे “द्वारका सर्कल” या द्वारका सर्कल पासुन अवघ्या पायी ५ मिनिटांच्या अंतरावर वसले आहे शंकरनगर.
“शंकरनगर सहकारी गृहनिर्माण संस्था” या संस्थेची स्थापना १९८६ साली झाली. संस्थेमध्ये एकुन १८४ सभासद आहे. शंकरनगर मध्ये १३२ कुटुंबे आणि ५२ दुकानदार आहेत. संस्थेच्या प्रारंगणात “श्री ऋणमुक्तेश्वर महादेव मंदिर” आहे. प्रतिवर्षी महाशिवरात्री उत्सव अतिशय आनंदाने साजरा केला जातो. तसेच समोरील शीतल सोसायटीतील श्री सिद्धिविनायक देवस्थानच्या गणेश जयंती पालखी सोहळ्याचे स्वागत उत्साहात करण्यात येते. मंदिरा पुढील भव्य सभामंडपात एका वेळेस १५० ते २०० भाविक सहज बसू शकतात. सोसायटी मध्ये सर्व समाज्याचे, जाती-धर्माचे परिवार अतिशय आनंदाने एकत्र राहतात.
सोसायटीच्या शॉपिंग सेंटर मध्ये दैनंदिन लागणाऱ्या सेवा जसे मेडिकल स्टोअर्स, किराणा वस्तू, लेडीज व जेन्टस पार्लर, टू व्हिलर सर्व्हिस स्टेशन, टी. व्ही. मॅकेनिक, दूध व भाजीपाला, लेडीज आणि जेन्टस टेलर, सौंदर्य प्रसादाने,जनरल स्टोअर्स इत्यादी उपलब्ध आहे. त्यामुळे सोसायटीतील सभासदांना बाहेर जाण्याची गरज भासत नाही. पेट्रोल पंप, गॅस सिलेंडर, सोलर ऊर्जेची साधने हे देखील जवळच उपलब्ध आहे. सोसायटी समोर मोरे (सर्जिकल अँड मॅटर्निटी) हॉस्पिटल सुद्धा आहे.
द्वारका सर्कल येथून आपणास नाशिक रोड रेल्वे स्टेशन ७ कि. मी. अंतरावर आहे. जेथून देश भरात रेल्वेने प्रवासास जात येते. ओझर विमानतळ फक्त १८ कि. मी. अनंतराव असून तेथून हैद्राबाद, मुंबई, पुणे, शिर्डी येथे जाण्याची सुविधा आहे. तसेच रस्तेमार्गे शिर्डी ९० कि. मी. तसेच त्रंबकेश्वर (जोतिर्लिंग) २८ कि. मी. अंतरावर आहे. सप्तशृंगी देवी (गड) ६५ कि. मी. अंतरावर आहे. सोसायटीच्या बस स्टॉप वरून २२ ते २५ बसेसच्या फेऱ्या होतात.
समर्थ रामदास स्वामींची तपोभूमी फक्त २ कि. मी. अंतरावर आहे. तसेच संत जनार्दन स्वामी यांची तपोभूमी देखील (तपोवन) २ कि. मी. अंतरावर आहे. पहाटेच्या आल्हाददायक वातावरणात पायी फिरण्यासाठी / मॉर्निंग वॉल्क साठी नागरिकांची गर्दी पहाटे पासून सुरु होते. तपोवन परिसरातच दर १२ वर्षांनी भरणारा कुंभमेळा भरत असतो. त्या वेळेस देशभरातील साधुसंतांचे दर्शन सहज गत्या उपलब्ध होते.
परिसरामध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल, रंगुबाई जुन्नरे स्कूल, रवींद्र विद्या प्रसारक संस्था (इंग्रजी / मराठी) माध्यम या सारख्या नामवंत संस्थाचे केंद्र पायी अंतरावर उपलब्ध आहे. तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, एच. डी. एफ. सी. बँक, आय. डी. बी. आय. बँक, बँक ऑफ बडोदा या सारख्या नामवंत बँक देखील पायी अंतरावर आहे अश्या जीवनावश्यक गोष्टीच्या केंद्र स्थानी आमचे हे “शंकरनगर सहकारी गृह निर्माण संस्था” वसलेली आहे. जी लवकरच पुनर्र विकासाच्या योजनेद्वारे नवीन, सुंदर व बहू माजली रूप धारण करण्याकडे वाटचाल करीत आहे.